नाशिक : प्रख्यात सतारवादक बुधादित्य मुखर्जी व भरतनाट्यमच्या प्रसिद्ध नृत्यांगना मंदिरा मनीष यांच्या कलाविष्काराने नटलेल्या ‘स्वरनृत्य उत्सवा’ची पर्वणी रसिकांना लाभणार आहे. येत्या रविवारी (दि.२०) रात्री ९ वाजता हा कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिरात रंगणार आहे.कार्यक्रमाची संकल्पना ‘पंचम निषाद’ची असून, निर्मिती मंत्रा फाउंडेशनची आहे. ‘मंत्रा’कडून ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित कार्यक्रम मालिकेतील हा या वर्षातील अखेरचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मंदिरा मनीष यांचे भरतनाट्यम होईल. त्यात त्या तुकारामाचे अभंग, संस्कृत मधुराष्टकम, घालीन लोटांगण आदिंवर नृत्य करणार आहेत. दुसऱ्या सत्रात मुखर्जी सतारीवर राग दरबारी, मालकंस सादर करतील. सतीश कृष्णमूर्ती, मैथिली कृष्णकुमार, एन. अभय, सौमेन नंदी हे साथसंगत करतील. कार्यक्रमासाठी सर्वांना खुला प्रवेश असून, मोफत प्रवेशिका महाकवी कालिदास कलामंदिरात उपलब्ध असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी पंचम निषादचे शशी व्यास, मंत्रा फाउंडेशनच्या दीपा त्रासी, मंदिरा मनीष व जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रविवारी रंगणार ‘स्वरनृत्य उत्सव’
By admin | Published: December 18, 2015 12:29 AM