नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप केले.भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजी महिन्यांनुसार वर्षातील पहिला सण मकरसंक्र ांत असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली. हिवाळा ऋ तूत हा सण येत असल्याने शरीराला उष्णतेची गरज भासते. त्यामुळे या दिवशी तीळ-गूळ देऊनच शुभेच्छा देण्याची प्रथा रु जली आहे. शहरातही पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात ही प्रथा साजरी करीत संक्र ांतीचा सण नाशिककरांनी उत्साहात सागरा केला.एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते. नवी कोरी कोळ्या रंगाची साडी परिधान करून गृहिणींना सुगड पूजने केले. तसेच सुगड्याचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली. महिलावर्ग संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत साजरी केल्या जाणाºया हळदी-कुंकवाच्या प्रथेला यादिवसापासून सुरु वात केली गेली. अनेक महिलांनी संक्रांतीच्या दिवशीच हळदी-कुंकवाचेही नियोजन करून कौटुंबिक उत्सव साजरा केला.दरम्यान, काही भागात मात्र सर्रासपणे नॉयलॉन मांजाचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. या भागात काही पक्षी जखमी झाले तर अनेकांना ईजाही झाल्याने नॉयलॉन मांजा वापरात असल्याचे दिसून आले. मात्र, मांजा तपासणीसाठी पोलीस कुठेही दिसून न आल्याने नॉयलॉन मांजाचा वापर झाल्याचे बोलले जाते.‘गयी बोल रे धिन्ना’आवाज यंदा ओसरला नॉयलॉन मांजामुक्त पतंगोत्सव साजरा करण्याबाबत करण्यात आलेल्या आवाहनामुळे यंदा शहरात ‘गयी बोल रे धिन्ना’चा आवाज ओसरल्याचे चित्र होते. दरवर्षी पतंग काटाकाटीच्या खेळासाठी वाद्याच्या तालावर आणि डीजेच्या धामधुमीत पतंगबाजीला उधाण येत होते. परंतु यंदा शहरात पतंगबाजीचा असा उत्साह कुठेही दिसून आला नाही. सामाजिक भान म्हणून अनेकांनी यंदा त्यांच्या भावनांना मुरड घातली. शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा पतंगबाजीचा उत्साह फारसा जाणवला नाही.
तिळाचा गोडवा; पतंगबाजीची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:30 AM
नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप केले.
ठळक मुद्देमकर संक्रांत : तीळगूळ सोहळा रंगला; पतंग उडविण्याचा घेतला आनंदएकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण