शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूची लागण झा

By admin | Published: February 07, 2015 1:54 AM

नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूची लागण झा

नाशिक : राज्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असताना नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिका सतर्क झाली असून, महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाला तातडीने दक्षता आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्ल्यूसाठी विशेष कक्ष ठेवण्यात आले असून, खासगी रुग्णालयांनाही स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सुमारे दोनशेहून अधिक रुग्णांना स्वाइन फ्ल्यूची लागण होऊन २२ रुग्णांचा बळी गेल्याने घबराट निर्माण झाली आहे. नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाला सतर्क करण्यात आले आहे. शहरात सिडकोतील कामटवाडे येथील एक, तर सातपूरमधील एकाला स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे, तर येवला, निफाड आणि अहमदनगर येथील तीन रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. जानेवारीपासून महापालिकेच्या स्क्रिनिंग सेंटरमध्ये एकूण ३६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.