नाशिक : जिल्'ात स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी घाबरून जाऊ नये, ‘मीच माझा डॉक्टर’ या संकल्पनेनुसार स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. स्वाइन फ्लूपेक्षा क्षयरोगाने मिनिटाला एक रुग्ण दगावतो आणि स्वाइन फ्लूपेक्षा अपघाताने जास्त लोक दगावतात, असा डॉक्टरी सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी जनतेला दिला आहे. स्वाइन फ्लूने शहर व जिल्'ाला विळखा घातलेला असतानाच आणि आतापर्यंत सहा बळी गेलेले असतानाच जिल्हा प्रशासनाला स्वाइन फ्लूचे गांभीर्य कळले आहे. महापालिका हद्दीतील नाशिक व मालेगाव महापालिकांना त्यांच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावेत, तसेच २५ व ५० खाटांची सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयांनाही स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेश वजा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी घाईगर्दीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत स्वाइन फ्लूबाबत जनजागृती हाच प्रमुख उपचार असल्याचे सांगितले. स्वाइन फ्लूची तीन प्रकारे वर्गवारी करण्यात आली असून, त्यानुसार अ, ब व क या संवर्गात स्वाइन फ्लूचे रुग्ण गृहीत धरण्यात आले आहे. त्यात क संवर्गातील किरकोळ स्वरूपातील सर्दी, पडसे, खोकला व स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांना गावपातळीवर व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवरच स्वतंत्र कक्ष उभारून उपचार करण्यात येणार आहे. तसेच ब संवर्गातील थोड्या कमी जोखमीचे मात्र ज्यांना श्वासोच्छवास घेणे अवघड जात असेल व रक्ताच्या उलट्या होत असतील, अशा रुग्णांना जिल्'ातील चार उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यासाठी चार-पाच खाटांचा स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात गंभीर स्थितीतील व अति जोखमीच्या रुग्णांवर दहा खाटांच्या स्वतंत्र स्वाइन फ्लूच्या कक्षात उपचार केले जाणार आहेत. नागरिकांनी स्वाइन फ्लूमुळे घाबरून जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, खिशात स्वच्छ रूमाल ठेवावा, मीच माझा डॉक्टर समजून स्वत:वर प्राथमिक उपचार करावेत, भरपूर विश्रांती घेऊन भरपूर पाणी प्यावे, अंगात अशक्तपणा येणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच व्हिटामिन सी चे पदार्थ खावेत, असा सल्ला डॉ. एकनाथ माले यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दुसाने, स्वाइन फ्लू कक्षाचे अधिकारी डॉ. गुंजाळ आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
खासगी रुग्णालयांमध्येही स्वाइन फ्लूचे स्वतंत्र कक्ष शल्य चिकित्सकांची माहिती, उपचार फक्त जनजागृतीपुरतेच
By admin | Published: February 20, 2015 1:13 AM