लोकमत न्यूज नेटवर्कन्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला शेतकरी संप दिवसेंदिवस चिघळत असून, वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी आंदोलने करीत आहेत. न्यायडोंगरीतही शेतकऱ्यांनी संपूर्ण गावातून भजनाच्या गजरात शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत प्रतीकात्मक तिरडीला अग्निडाग देत अंत्यविधी पार पाडला. या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत माजी आमदार अनिल अहेर, माजी सभापती विलास अहेर, राजेंद्र अहेर, संजय अहेर, विजय अहेर, सुनील अहेर, सोसायटी चेअरमन राजेंद्र अहेर यांच्यासह शेतकरी व गावातील नागरिक सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. श्रीराम मंदिरच्या प्रांगणात अंत्ययात्राची सांगता करण्यात आली. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडण केले.आठवडे बाजार बंदन्यायडोंगरीचा आठवडे बाजार हा तालुक्यातील सर्वात मोठा बाजार समजला जातो. आज बाजार बंदचा इतिहास झाला. कारण सकाळपासूनच बाजारात शुकशुकाट दिसत होता. पहिल्यांदाच कडकडीत बाजार बंद राहिला. मेडिकलदेखील बंद होते हे विशेष. दूध संकलन केंद्रे बंद होती. या बाजारात भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ विक्र ी करणारेदेखील फिरकले नसल्याने संपूर्ण गावात शुकशुकाट दिसत होता. या बंदमुळे लाखो रु पयांची उलाढाल थांबली. गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवून संपात सहभाग नोंदविला.न्यायडोंगरी येथे संपात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली.
न्यायडोंगरीत प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By admin | Published: June 06, 2017 2:03 AM