नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे त्यांना चौदा दिवसांनंतर क्वॉरंटाइन म्हणजेच विलगीकरण करण्याचे शासनाने आदेश आहेत. मात्र गेल्या दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक मालेगाव शहरात करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्याऐवजी बदली कर्मचारी कोण द्यायचे? असा प्रश्न यंत्रणेपुढे पडला आहे.कोरोनाचा संक्रमण कालावधी चौदा दिवसांचा असून, या काळातच रुग्णाला त्याचे लक्षणे दिसतात व त्याच काळात त्याच्यावर योग्य उपचार होणे जसे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील या चौदा दिवसांच्या काळात स्व:तच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. चौदा दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधित रुग्ण बरा होत असल्याचे आजवरच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले असून, संशयित रुग्णांनादेखील चौदा दिवसच क्वॉरंटाइन ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाधित, संशयित रुग्णांबरोबरच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचाºयांनादेखील चौदा दिवस क्वॉरंटाइन ठेवण्यात यावे, असे मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मालेगाव शहरात सापडत असून, तेथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने लगतच्या तालुक्यातील सुमारे १४२ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची सेवा मालेगावी वर्ग करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लावला आहे. आजच्या घडीला मालेगावी गेलेल्या या वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी जाऊन गेल्या दहा दिवसांपासून आरोग्य सर्व्हे करीत आहेत. येत्या दोन, तीन दिवसांत या पथकाला क्वॉरंटाइन करावे लागणार आहे, मात्र या कर्मचाºयांच्या बदल्यात कोण? असा प्रश्न आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.-------------------------प्रश्न कायम : अतिरिक्त मनुष्यबळाची समस्यामुळात मालेगाव तालुक्यात लगतच्या तालुक्यातूनच जिल्हा परिषदेने आपले वैद्यकीय पथक मालेगाव शहरासाठी पाठविले होते. या पथकांच्या गैरहजेरीत अन्य तालुक्याचे कामकाज इतर अधिकाºयांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले. परंतु आता पुन्हा नव्याने अधिकाºयांची तजवीज कोठून व कशी करणार? असा प्रश्न पडला आहे. मालेगाव शहरात काम करण्यास मुळातच वैद्यकीय पथक नाखूष असले तरी, सद्यपरिस्थिती पाहता मालेगाव शहरासाठी अतिरिक्तमनुष्यबळ कोठून व कसे उपलब्ध करायचे? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
बदली आरोग्य कर्मचारी देण्यावरून यंत्रणा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:59 PM