नाशिक : मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार वसीम अब्दुल रहेमान (२७,रा. भारतनगर, वडाळारोड) यास पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले होते; मात्र तरीदेखील तो सर्रासपणे शहरात वावरत होता. गुन्हे शाखा युनिट-१चे हवालदार अनिल दिघोळे, नाईक रावजी मगर हे गस्तीवर असताना दिघोळे यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना याबाबत कळविले. वाघ यांनी त्या जागेवर जाऊन सापळा रचला. वसीम हा भारतनगरमध्ये आला असता त्यास शिताफीने पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम याला एक वर्षासाठी शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते; मात्र तरीही तो विनापरवानगी शहरात वावरत होता.
तडीपार गुंडाला भारतनगरमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 1:17 AM