सटाणा : कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. १) निलंबनाची कारवाई केली. अचानक दफ्तर तपासणी मोहिमेंतर्गत ही कारवाई केल्याने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ताहाराबाद व साल्हेर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशोर भामरे यांच्या विरोधात ताहाराबाद व मुल्हेर येथील घरकुल योजना, शौचालय आदी विकासकामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेकवेळा त्यांच्या विरुद्ध शिष्टमंडळदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली होती. मात्र अनेक अधिकाºयांनी त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांच्याकडे तक्रारींचा पाऊसच पडला. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी डॉ. गिते यांनी अचानक सटाणा पंचायत समितीला भेट देऊन दफ्तर तपासणी केली. या तपासणी मोहिमेत बहुतांश ग्रामसेवकांच्या दफ्तरामध्ये अनियमितता आढळून आल्याने गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी तक्रारींमुळे वादग्रस्त ठरलेले ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी भामरे यांना आपले दफ्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या; मात्र भामरे यांनी दफ्तर न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने डॉ. गिते भडकले. यावेळी डॉ.गिते यांनी भामरे यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देऊन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची सूचना केली. डॉ. गिते यांच्या या कारवाईमुळे सर्वच ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे. डॉ. गिते यांच्या रडारवर आणखीन काही ग्रामसेवक असल्याचे बोलले जात आहे.टॅँकर घोटाळ्याची चर्चाबागलाण तालुक्यात पस्तीसहून अधिक गावांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरच्या फेºया आणि कागदोपत्री लांबचे अंतर दाखवून कमी अंतरावर टॅँकरने टॅँकर भरले जातात. यामुळे डीझेल आणि फेºयांमध्ये फेरफार करून लाखो रु पयांचा घोटाळा झाला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. याबाबत एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारातून पुरावे गोळा केले असून, याबाबतही डॉ. गिते यांच्या दौºयादरम्यान उलटसुलट चर्चा सुरू होती. या टॅँकर घोटाळ्यात काही बडे अधिकारी असल्याचेही बोलले जात आहे.
ताहाराबादचे ग्रामविकास अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:32 AM
कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. १) निलंबनाची कारवाई केली.
ठळक मुद्देवाढत्या तक्रारी : मुख्याधिकाऱ्यांनी अचानक केली दप्तर तपासणी