पाथरे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेल्या भागात कोरोनसोबत मुकाबला करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून प्रशासनातर्फे या योद्धांचे मनोधैर्य वाढविण्यात आले.या भागात काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता. त्यामुळे प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील आणि सहवातील २१ जणांना पुढील तपासणीसाठी नाशिक येथे हलविले होते. त्यानंतर यातील अजून एकाची कोरोना तपासणी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तहसीलदार राहुल कोताडे यांनी पाथरे आणि कोळगावमाळ येथे भेट देऊन परिस्थिती जाणून सर्व माहिती घेतली. तहसीलदारांनी आरोग्य विभाग, वारेगाव, पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, कोळगावमाळ ग्रामपंचायतलाही सूचना दिल्या. दुसºया करोना ग्रस्ताच्या सहवातील लोकांची वारेगाव, कोळगावमाळ येथील चौकशी केली.परंतु सदरचा व्यक्ती वारेगाव आणि कोळगाव येथे फिरलेला नाही. तो कोणाच्याही सहवात आला नसल्याचे समजले. तहसीलदार कोताडे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी यावेळी संवाद साधला. सद्यस्थितीत चालू असलेले काम योग्य पध्दतीने होत आहे. प्रत्येक कुटुंबाची तपासणी, हिस्ट्री जाणून घ्या. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती कोणाच्याही सहवात आला नाही ना याची खात्री करा. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. सामाजिक दुरी ठेवा असेही ते म्हणाले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन बच्छाव, वावी प्राथमिक आरोग्य अधिकारी अजिंक्य वैद्य, श्रीकांत शेळके, वैभव गरुड आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायतच्या वतीने वारेगाव या ठिकाणचा परिसर निर्जंतुक करण्यात आले. दर पाच दिवसांनी परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुकचा परिसरही निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
तहसीलदारांनी वाढवले कोरोना वॉरिअर्सचे मनोधैर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:10 AM
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेल्या भागात कोरोनसोबत मुकाबला करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून प्रशासनातर्फे या योद्धांचे मनोधैर्य वाढविण्यात आले.
ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील पाथरे, कोळगावमाळ भागात भेट