निवड चाचणी : बॅँकॉक येथे मिळविले रौप्यपदकनाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद केली आहे. या स्पधेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.बॅँकॉक येथे सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेत ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये ४:२४:१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले. कारकिर्दीतील तिची ही उत्कृष्ठ वेळ असून या कामगिरीमुळे ताईला युथ आॅलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. ताई ही ८०० आणि १५०० मीटरमध्ये भारताचे आशास्थान मानले जाते. दिल्ली येथे नुकत्याच झालेलेया ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीमुळे तिची बॅँकॉक येथील पात्रता फेरीसाठी निवड झाली होती.आशियाई आणि आॅलिम्पिक खेळासाठी खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातून खेळाडूंचा शोध घेण्यात आला होता; त्यातून केंद्राने ताईची निवड करण्यात आली होती. आगामी आशियााई आणि आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे सक्षम प्रतितनिधीत्व करू शकणाºया खेळाडूंच्या यादीत ताईचा समावेश करण्यात आला होता तो विश्वास ताईन सार्थ ठरविला आहे.--इन्फो----सर्वात चपळ धावपटू--दरम्यान, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे ८०० मीटरमध्ये नाशिकची उदयोन्मुख धावपटू ताई बामणे हिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून ताईने महाराष्ट्रासाठी पदक जिंकत सर्वात चपळ धावपटू होण्याचा मान मिळविला होता.--इन्फो--संजीवनी यापूर्वीच आशियाईसाठी पात्रगुवाहटी येथील ५८ व्या राष्टÑीय वरिष्ठ गटातील अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने चमकदार कामगिरी केल्याने तिची यापूर्वीच आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. बंगरुळू येथे झालेल्या टीसीएस जागतिक अॅथेलेटिक्स स्पर्धेत संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रमही प्रस्थापित केला होता. ताईने बॅँकॉक येथील स्पर्धेत ४:२४:१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले.
‘यूथ आॅलिम्पिक’साठी ताई बामणे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 4:58 PM
: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद केली आहे. या स्पधेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
ठळक मुद्देबामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड