नाशिक : अशोक स्तंभ येथे राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामिण मिनी बसने दुचाकीस्वार व मोटारीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या तीहेरी अपघतात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.इगतपूरी-नाशिक या मार्गावरील मिनी बस ‘यशवंती’ (एम.एच.०७ सी ७६९५) अशोक स्तंभावरून पंचवटीकडे जात असताना सदर अपघात झाला. सदर बस इगतपूरी-नाशिक मार्गावरील असताना अशोकस्तंभावरून नेमकी कुठल्या दिशेने निघाली होती? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. या बसने पाठीमागून दुचाकीला (एमएच.१५ बीएम २७११) जोरदार धडक दिली त्यानंतर मारुती स्विफ्ट मोटार (एम.एच १५एफएफ१२६४)ला धडक दिली. अशा या तीहेरी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण प्रथमदर्शनी समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तिहेरी अपघातात एक गंभीर; बसचे ब्रेक निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:23 PM
बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण प्रथमदर्शनी समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ठळक मुद्देइगतपूरी-नाशिक या मार्गावरील मिनी बस ‘यशवंती’ (एम.एच.०७ सी ७६९५)बसने पाठीमागून दुचाकीला (एमएच.१५ बीएम २७११) जोरदार धडक दिलीर मारुती स्विफ्ट मोटार (एम.एच १५एफएफ१२६४)ला धडक दिलीअपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला