नाशिक : जिल्ह्यातून मराठवाड्या-तील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले पाणी व प्रत्यक्षात धरणात असलेला साठा याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याला दिले असून, भविष्यात जायकवाडीसाठी पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी म्हणून जायकवाडीचा पाणी साठाही मोजण्यात येणार आहे.पाण्याच्या समन्यायी वाटपाचा भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी कोरड्या पडलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिकच्या गंगापूर व दारणा धरणातून बारा टीमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निळवंडे धरणातूनही पाणी सोडण्यात आले होते. त्यावरून नाशिक-नगर-मराठवाडा, असा वाद होऊन पाण्याच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले होते. जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे गोदावरी अक्षरश: कोरडी पडली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जायकवाडीला आपोआपच ६५ टीएमसी पाणी पोहोचले. पत्रात प्रत्यक्षात जायकवाडी धरणाला भेट देण्याचे तसेच जायकवाडीमधून कालव्याद्वारे किती पाणी सोडण्यात आले त्याचीही माहिती गोळा करण्याचे सांगण्यात आले आहे. माहिती जिल्ह्णातील पाण्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्णातून भरपूर पाणी आजवर मिळूनही मराठवाड्याकडून पाण्यासाठी पुन्हा ओरड होऊ नये, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
जायकवाडीच्या पाण्याचा हिशेब घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:58 AM