याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुप मंडल ही संघटना कोण चालवते, तिला अर्थसाहाय्य व राजकीय संरक्षण कोण देते याची सीबीआय चौकशी करून तातडीने ठोस कारवाई करावी, अनुपची सोशल मीडिया अकौन्ट बंद करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. जैन समाजाविरुद्ध दुष्प्रचार करून लोकांना भडकावून हिंसेस प्रवृत्त करणाऱ्या या संघटनेविरुध्द राजस्थानात गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयानेही कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही ठोस कारवाई केलेली नाही. जैन मुनी, साध्वी पायी गावोगावी जाऊन अहिंसेचा प्रसार करतात. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये अशा पायी जाणाऱ्या पाचशे मुनी, साध्वींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. यामागे अनुप संघटना असावी, अशी शंका आहे. या संघटनेवर तातडीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारस मोदी, महामंत्री शशिकांत कर्नावट, समन्वयक सुनील चोपडा आदींच्या सह्या आहेत.