नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या आहेत. तसेच परिचारिकांनी नवजात शिशुंना हात स्वच्छ हात धुऊनचा हाताळावे, तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयायोजना करावी तसे न करणाºया परिचारिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दीपक सांवत यांनी दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.३०) आयोजित केलेल्या साथरोग व आरोग्याच्या इतर समस्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी डॉ. दीपक सावंत बोलत होते. येवेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे आदी उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वाइन फ्ल्यूबाबत प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगतानाच २०१८ मध्ये स्वाइन फ्ल्यूचे नऊ रु ग्ण दगावल्याने संबंधित आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आरोग्य मंत्र्यांच्या आढावा बैठकीत नाशिक मनपा हद्दीत हिवतापाचे २, डेंग्यूचे २२० व चिकनगुन्याचे १९ रुग्ण आढळून आले, तर ग्रामीण भागात हिवतापाचे सहा, डेंग्युचे ३३ आणि चिकनगुन्याचे २१ रुग्ण आढळून आले. मालेगाव मनपा क्षेत्रात फक्त डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले. मालेगावच्या तुलनेत नाशिक शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेने याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सावंत यांनीव्यक्त करताना शहरासह ग्रामीण भागात नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी विविध मार्गाने जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोरडा दिवस पाळावासाथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरातील संवेदनशील भागासह ग्रामीण भागातील डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन डॉ. दीपक सावंत यांनी केले. सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे २४ तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक औषधोपचार सुरू करावेत. तसेच खासगी रु ग्णालयांनी व वैद्यकीय महाविद्यालयांनी तत्काळ उपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छतेची खबरदारी न घेणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:32 AM
नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या आहेत. तसेच परिचारिकांनी नवजात शिशुंना हात स्वच्छ हात धुऊनचा हाताळावे, तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयायोजना करावी तसे न करणाºया परिचारिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दीपक सांवत यांनी दिले आहे.
ठळक मुद्देदीपक सावंत : आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना