चांदवड : भूमिअभिलेख खात्यातील मोजणी कामासाठी खासगी व्यक्ती अनधिकृतपणे पैसे मागतात अशा व्यक्तीवर भूमिअभिलेख अधिकाºयांनी त्वरीत गुन्हा दाखल करावा, जलयुक्तच्या कामात हयगय करू नये असा इशारा देत , आमसभा ही जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असते. यात जर अधिकारी कसूर करीत असतील तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयांनी त्यांची गय करू नये अशा सूचना चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत बोलताना व्यक्त केले. चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत विविध विकासकामांवर चर्चा झाली. आमसभेस अनुपस्थित अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस द्या, ही आमसभा चांदवड येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार डॉ. अहेर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, सभापती डॉ. नितीन गांगुर्डेे, उपसभापती अमोल भालेराव, जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव, सदस्य नितीन अहेर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार डॉ. अहेर यांनी बोलताना सांगितले की, चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर या आमसभेस नाहीत, त्यांचे बरेच प्रश्न असून, त्यासाठी स्वतंत्र बैठक पुढील महिन्यात घेऊ तर या आमसभेत ज्या प्रश्नांवर चर्चा झाली त्यांची सोडवणूक येत्या तीन आठवड्यात व्हावी, तसा अहवाल त्वरित पाठवावा अशा सूचना अधिकाºयांना बैठकीत देण्यात आल्या. चांदवड तालुका सातत्याने दुष्काळी तालुका असून पुणेगाव, ओझरखेड, राहुड -ऊसवाड पाटचारी, वडबारे पाटचारी, जांबुटके धरणाची उंची वाढविणे, मांजरपाडा आदी प्रश्नांसाठी शासनाने दखल घेऊन लवकरच या प्रश्नासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हे प्रश्न सुटतील त्या कामाची माहिती आमदारांनी दिली. येणाºया पावसाळ्यात राहुड उसवाड पाटचारीला पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.उपस्थित पदाधिकाºयांनी आपापल्या भागातील वीज, पाणी, रस्ते, भूमिअभिलेख, तहसील कार्यालय, मोजणी आदी समस्या मांडल्या. प्रास्ताविक गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जर्नादन देवरे, सुनील सोनवणे यांनी केले. यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता नीलेश नागरे, एस. टी. महामंडळाचे दत्तप्रसाद बागुल, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, विजय पवार, भूमिअभिलेखचे राजेंद्र कपोते आदी उपस्थित होते. या सभेत चांदवड शहराची पाणी योजना, चांदवड मनमाड रस्ता, तालुक्यातील प्रलंबित रस्ते, चांदवडचा बसस्थानकाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, शाळांच्या वीजबिलाच्या प्रश्नावर आमदारांनी माहिती सभेत दिली. तर यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नार-पारचा पाणी प्रश्न व चांदवड तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
पैसे मागणाºयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:18 AM