नाशिक- सध्या कोरोनाचा संसर्ग वाढु लागल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले जात असून काही जण चक्क दैवी तोडगे, होम हवन आणि तावीज वापरण्याच्या सूचना करीत आहेत. अशा प्रकारचे सल्ले देणाऱ्यांवर जादू टोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात समितीचे सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. कोरोना मुळे नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यमाुळे काी लोक कोरोनावर दैवी उपचार सांगत आहेत. तसेच त्यातून अंधश्रध्दा पसरवत आहेत. त्यामध्ये मूर्तीला मास्क बांधणे, होम हवन, पुजा अर्चा, मंतरलेला तावीज विकणे यामुळे माजत अंधश्रध्दा पसरण्यास आणि बळकट होण्यास मदत मिळणार आहे याशिवाय मास्कचा तुटवडा होणार आहे. समाजमनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
अशाप्रकारे दैवी उपचार, तोडगे, उपचार सांगणाºयांचा शोध घेऊन जादू टोणा विरोधी कायदा त्याच बरोबर करोनाबाबत अफवा पसरण्याचा कायदा याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.