नांदगाव : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचेवरील दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरीत रद्द करावेत व ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर बदनामी केल्यामुळे मानहानीचा दावा त्वरीत दाखल करावा अशी मागणी वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण महाराज बुरकुल व हिंदु रक्षक धर्म परिषदेचे आणि बजरंग शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती बाबुराव फणसे, धर्म जागरण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांनी केली आहे. तहसीलदारांना याबाबतीत निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, या आधीही तृप्ती देसाई, रंजना गयादे यांनीही महाराजांवर आरोप केले होते. आताही संगमनेर येथील डॉ.भवर यांनी महाराजांविरूध्द संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फिर्याद दाखल केलेली आहे. ही फिर्याद शासनाने त्वरीत मागे घ्यावी. संबंधितांवर त्वरीत गुन्हे दाखल करावेत.तसेच निष्पाप साधुंच्या झालेल्या हत्या यावर योग्य प्रकारे लक्ष देवून शासनाने मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी. साधुसंतांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी बाळकृष्ण बुरकुल, ज्ञानेश्वर बोगीर, चैतन्य राठोड, निवृत्ती फणसे, साहेबराव खैरनार, प्रमोद काकड आदी उपस्थित होते.
इंदोरीकर महाराजांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 8:25 PM