नाशिक : दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागेल त्याला टॅँकर देण्यात यावेत, परंतु पाण्याच्या खेपा मारणाºया टॅँकरची पडताळणी करण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. चारा छावण्या सुरू करण्यासाठी घालून दिलेल्या अटी-शर्ती जाचक असल्याने त्याशिथिल करण्याबाबत विचार करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.राज्याचे मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी टंचाई व दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन टॅँकरची माहिती घेतली. नाशिक जिल्ह्णात २५६ टॅँकरद्वारे ६५४ फेºया टंचाईग्रस्त गावांमध्ये मारल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. त्यावर ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी टॅँकरची मागणी असेल ती पूर्ण करण्यात यावी, परंतु टॅँकर योग्य गावांना पोहोचतो किंंवा नाही याची वेळोवेळी खातरजमा करण्यात यावी त्यासाठी तहसीलदार, प्रांत अधिकाºयांंकडून ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ करण्यात यावे. त्याचबरोबर गावात टॅँकर पोहोचत असेल तर त्यासाठी गावातील प्रमुख व्यक्तीची स्वाक्षरी घेण्यात यावी, टॅँकर पूर्ण क्षमतेने पाणी भरले किंवा नाही याची पाहणी करण्यात यावी अशा सूचना दिल्या.उर्वरित जनावरांचा प्रश्नयावेळी जनावरांच्या चारा छावण्याबाबतही सचिवांनी माहिती जाणून घेतली. जिल्ह्णात मागणीनुसार छावण्या सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चारा छावण्यांमध्ये एका शेतकºयाच्या पाचच जनावरांना भरती करावी, असे शासनाचे आदेश आहेत, परंतु अनेक शेतकºयांकडे त्यापेक्षा अधिक जनावरे असल्याने उर्वरित जनावरांचा प्रश्न निर्माण होत असल्याची बाब काही जिल्ह्णांनी निदर्शनास आणून दिली.नाशिक जिल्ह्णात सीएसआरमधून शंभर पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सिन्नर, येवला, नांदगाव, बागलाण या तालुक्यांना काही प्रमाणात त्याचे वाटप करण्यात आले आहे. या टाक्यांमध्येच टॅँकरचे पाणी टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाण्याच्या खेपांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना देण्यात आले आहेत. तसेच टॅँकरमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी भरण्याच्या ठेकेदारांना तंबी देण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
टॅँकरच्या फेऱ्यांची गोपनीय तपासणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:42 AM
नाशिक : दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागेल त्याला टॅँकर देण्यात यावेत, परंतु पाण्याच्या खेपा मारणाºया टॅँकरची पडताळणी करण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. चारा छावण्या सुरू करण्यासाठी घालून दिलेल्या अटी-शर्ती जाचक असल्याने त्याशिथिल करण्याबाबत विचार करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
ठळक मुद्देसरकारचे आदेश : चारा छावण्यांबाबत फेरविचार