नाशिक : खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. त्यामुळे दि. १६ जुलै रोजी ग्रहण वेधकाळात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपुजन करता येईल, असा निर्वाळा सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी दिला आहे.मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच खंडग्रास चंद्रग्रहणाचा वेधारंभ होणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आल्याने ग्रहणवेधकाळात गुरुपूजन करावे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्याबाबत खुलासा करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, खंडग्रास चंद्रग्रहण हे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन मात्र निषेध आहे. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा करता येतात. त्यामुळे ग्रहण वेधकाळातही गुरुपूजन करता येईल. तसेच पौर्णिमेनिमित्त केली जाणारी सत्यनारायणाचीही पूजा व कुलधर्म करता येईल. दुपारी ४ वाजेपर्यंत भोजन घेता येईल, मात्र सायंकाळी वेधकाळात गुरुपूजन करावयाचे असल्यास खडीसाखरेचा प्रसाद घ्यावा, अशी माहितीही मोहनराव दाते यांनी दिली आहे.ग्रहणाची मुंबईतील स्थितीवेधारंभ : दुपारी ४ वाजेपासून (१६ जुलै)स्पर्श : रात्री १ वाजून ३२ मिनिटे (१७ जुलै)मध्य : रात्री ३ वाजून १ मिनिट (१७ जुलै)मोक्ष : पहाटे ४.३० वाजता (१७ जुलै)ग्रहणपर्व : रात्री २ वाजून ५८ मिनिटेसंपूर्ण भारतात दिसणारभारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, आॅस्ट्रेलिया, न्यूझलिंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आदी ठिकाणी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे
ग्रहणवेधकाळातही मंगळवारी करा गुरुपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 4:58 PM
दाते पंचांगकर्ते : पौर्णिमेच्या पूजेलाही अडसर नाही
ठळक मुद्देखंडग्रास चंद्रग्रहण हे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत