चांदवड : खऱ्या भारताच्या प्रगतीसाठी गावाच्या विकासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन मलेशिया येथील पहांग विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजन जोश यांनी केले. येथील नेमिनाथ जैन संस्थेचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयाच्या सातदिवसीय हिवाळी शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी होते. डॉ. राजन यांनी गावातील विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. चार भिंतींच्या आतील शिक्षणाबरोबरच समाजासाठी, ग्रामीण भारताच्या विकासासाठी आपण हातभार लावला पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.पंचायत समितीचे उपसभापती नितीन आहेर, राजदेरवाडीचे उपसरपंच मनोज शिंदेआदिंची भाषरे झाली. कार्यक्र म अधिकारी प्रा. स्वप्निल वाघ यांनी सात दिवसात राजदेरवाडी गावात केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. विविध व्याख्यान व उपक्र म या सात दिवसात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आले. योग साधनेवर ए.बी. येवला व नूतन गायकवाड यांचे व्याख्यान झाले तसेच प्रा. पी.आर. सोहनी यांचे राष्ट्रीय सेवा योजनेची वैशिष्ट्ये या विषयावर व्याख्यान झाले. समारोपप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक गोरख पानपाटील, वैभव पवार, आकाश पवार, अंजली जाधव, सुवर्णा अहिरे, मेघा अहिरे, सुषमा हिरे, योगेश अहिरे, राहुल जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभारप्रदर्शन प्रा. दीपेश अग्रवाल यांनी केले. प्रमुख चांदवड पंचायत समितीच्या सभापती पुष्पा धाकराव, उपसभापती नितीन आहेर, राजदेरवाडीच्या सरपंच सखूबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, प्राचार्य जी.एच. जैन, उपप्राचार्य दत्ता शिंपी, सुरेश पाटील, ग्रामसेवक बी.पी. सोनवणे उपस्थित होते. कार्यक्र म अधिकारी डॉ. तुषार चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले
गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 9:53 PM
खऱ्या भारताच्या प्रगतीसाठी गावाच्या विकासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन मलेशिया येथील पहांग विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजन जोश यांनी केले. येथील नेमिनाथ जैन संस्थेचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयाच्या सातदिवसीय हिवाळी शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी होते.
ठळक मुद्देराजन जोश : श्रम शिबिराचा राजदेरवाडीत समारोप