नाशिकरोड : पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.आर्टिलरी सेंटररोड माहेश्वरी भवनमध्ये शिखरेवाडी मॉर्निंग वॉक ग्रुप, महेश सेवा समितीतर्फे ओजस लाइफ स्टाइल यांच्या वतीने स्वस्थ भारत २०२५ या उपक्रमांर्गत ओजस जीवन शैलीबाबत बोलताना शहा यांनी सांगितले की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जीवनशैली, आहार कसा असावा याबाबत त्यांनी मागदर्शन केले. यावेळी ते म्हणाले हिरव्या भाजीपाला, फळे, ड्रायफ्रूट््स, कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. सकाळी फलहार घ्यावा. दुपारच्या जेवणात सॅलेड, कडधान्ये घ्यावे. रात्रीच्या जेवणात गव्हाची पोळी न घेता ज्वारी, बाजरी किंवा नागलीची भाकरी घ्यावी. सकाळच्या व रात्रीच्या जेवणात चौदा तासांचे अंतर असावे. आपले जेवण आणि जीवन शैली ही एक औषधाच्या रूपाने कार्य करते, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, अस्थमा, स्थूलपणा, आम्लता, वायुदेष, डोळेदुखी, सांधेदुखी, त्वचारोग यावर शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हसमुख गोसराणी, रंजन पांडे, विलास वेळकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास लोया, राधेशाम बूब, नंदू लाहोटी, रामेश्वर जाजू, हरिष उभ्राणी, विजय केला, शम्मीशेठ आनंद, संजय कलंत्री, रामेश्वर मालाणी, रवि अस्वले, रमणशेठ कपूर, रोहिदास वाघ, सुनील जाजू, विशाल जाजू, रामरतन राठी, रमेश जरीवाल, मुकेश आमेसर आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यासाठी योग्य आहार घ्यावा : अतुल शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:04 AM