सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सर्वतीर्थ ग्रामपंचायत टाकेद बु येथे आपत्ती व्यवस्थापन समिती, कोरोना दक्षता समिती, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने टाकेद गाव अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दवाखाने वगळता पाच दिवस कडेकोट बंद करण्यात आले आहे. १७ ते २१ एप्रिलपर्यंत टाकेद गाव पूर्णतः कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला स्थानिक व्यावसायिक, दुकानदार, भाजी विक्रेते यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला. या बंद काळात गावातील तिनही मुख्य रस्त्यांवर कोरोना संपर्क अधिकारी कैलास भवारी, सरपंच ताराबाई बांबळे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, प्राचार्य तुकाराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून येणाऱ्या-जाणाऱ्यांची थर्मल तपासणी करून त्याची नोंद ठेवण्यात येत आहे.
टाकेद बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 1:19 AM