नाशिक : वीजचोरी रोखण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर असते. चोरीछुपे पद्धतीने होणारी वीजचोरी उघड करणे तसे अवघड काम, मात्र अशी चोरी उघडकीस आली तर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच प्रसंगी गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. अशा प्रकारच्या अनेक कारवाया महावितरणकडून करण्यात आलेल्या आहेत. घरातून दुसऱ्याला वीज जोडणी देणे हादेखील चोरीचाच गुन्हा असल्याचे अनेकांना माहितही नसावे. अशा अनेक घटनांमध्ये संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जाते. ग्रामीण भागात तर वीजतारांवर आकडे टाकून सर्रासपणे वीजचोरी केली जाते. त्यातच घरातील वीज दुसऱ्याला देण्याचा प्रकारदेखील चोरीच समजली जाते. वीजचोरी करणाऱ्यांवर कलम १३५ व १२६ नुसार गुन्हादेखील दाखल केला जातो. त्यामुळे ग्राहकांनी अशा प्रकारची कोणतीही वीजचोरी करू नये, असे आवाहन महावितरणकडून केले जाते.
--इन्फो--
कायदा काय सांगतो?
वीज विक्री कुणी करावी याबाबतचा निश्चित असा कायदा आहे. विद्युत अधिनियमानुसार महावितरण तसेच संलग्नित कंपन्यांना वीज विक्रीचा अधिकार देण्यात आलेला आहे. महावितरण देखील अशा कंपन्यांकडून वीज विकत घेऊ शकते. त्यामुळे विजेची विक्री करण्याचे धोरण ठरविण्यात आलेले आहे. त्यामुळे एखाद्याने आपल्याकडे असलेली वीज दुसऱ्याला देण्याचा प्रकार फौजदारी गुन्हा ठरू शकतो.
--इन्फो--
चोरी कळवा, बक्षीस मिळवा योजना गुंडाळली
गावखेड्यात तसेच दुर्गम भागात होणारी वीजचोरी तसेच शहरात चोरीछुपे पद्धतीने होणारी वीजचोरी उघड करणे महावितरणला आव्हानात्मक ठरते. किंबहुना घरोघरी जाऊन अशा प्रकारची चोरी शोधणे कठीण असते. महावितरणचा स्पेशल स्कॉड असला तरी सामाजिक पातळीवर त्यांनाही अनेक अडचणी येतात. काही भागात तर वीज कंपनीचे कर्मचारी पोहोचू देखील शकत नाहीत. अशा वेळी ज्यांनी वीजचोरी कळविली त्यांना बक्षीस देण्याची योजना काही वर्षांपूर्वी राबविण्यात आली होती. त्यासाठी संबंधिताला बक्षीसही दिले जात होते. परंतु आता ही योजना बंद करण्यात आलेली आहे. मात्र चोरीविरुद्धची मोहीम सुरूच आहे.
--इन्फाे--
कारवाई तर होणारच
वीजचोरी विरुद्धची मोहीम महावितरणकडून राबविली जाते. वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा असून कोणत्याही मार्गाने केलेली वीजचोरी ही चोरीच असल्याने प्रसंगी संबंधितावर फौजदारी कारवाई देखील केली जाते. याशिवाय पूर्वलक्षी प्रभावाने दंडात्मक कारवाई देखील केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी सतर्कता राखलेली बरी.
---इन्फो--
महावितरणकडून झालेली कारवाई