येवला : जमीन घोटाळा व शासकीय योजनांचे अनुदान हडप करणाऱ्या तलाठी अतुल थुल यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
हडपसावरगाव येथील शेतजमिनीस पत्नीला वारस लावून जमीन हाडपण्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबरोबरच शासकीय अनुदान पत्नीच्या नावाने हडप केल्याचेही उघडकीस आल्याने तलाठी अतुल थुल याच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून थुल फरार होता. शनिवारी (दि. १५) तालुका पोलिसांनी थुल यास शहरातून अटक केली. थुल यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत.