जोरण : गावात तलाठी कार्यालय आहे परंतु तात्यासाहेब असतात तालुक्याला आणि कोतवाल आहे परंतु तेही नेहमी गायब असतात. अशावेळी शासकीय कामांसाठी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न बागलाण तालुक्यातील बागलाण तालुक्यातील जोरण,कपालेश्वर,देवपुर( चाफ्याचेपाडे ),निकवेल,विंचुरे या गावातील गावकऱ्यांना पडला आहे.जोरण येथे चार ते पाच गावांचे तलाठी कार्यालय आहे परंतु कार्यालयाचे कर्मचारी येथे भेटत नाहीत. जोरण हे परिसरातील शेतकऱ्यांना मध्यवर्ती केंद्र असल्याने याठिकाणी नेहमी शासकीय कामांसाठी शेतकऱ्यांची वर्दळ असते. आसपासच्या गावचे शेतकरी व ग्रामस्थ पायपीट करत येथे येतात परंतु, कार्यालयातील संबंधित तलाठी महोदय भेटत नाहीत. ते असतात तालुक्याच्या गावाला. तलाठीच नसल्यानेही कर्मचारीही गायब असतात. त्यामुळे शेतकरी-ग्रामस्थांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. शासनामार्फत शेतक-यांसाठी विविध योजना राबविल्या जातात परंतुल केवळ तलाठी उपलब्ध होत नसल्याने अनेकांना या योजनांची माहिती मिळत नाही, परिणामी त्यांना योजनांपासून वंचित राहावे लागते. संबंधित अधिका-यांनी याठिकाणी तत्काळ चौकशी करुन कायमस्वरुपी तलाठ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.उडवाउडवीची उत्तरेगेल्या काही वर्षापासुन जोरण येथील तलाठी प्रकृती साथ देत नसल्याने तालुक्याच्या ठिकाणीच काम करतात. परंतु, तलाठी उपस्थित राहत नाही म्हणून कोतवालही कार्यालयाचे कुलूप उघडत नाही. ब-याचदा या कोतवालाकडून ग्रामस्थ-शेतक-यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी.- जगदिश सावकार, शेतकरी, जोरण
तलाठी तालुक्याला, कोतवाल गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 5:24 PM
दाद मागायची कुणाकडे? : जोरणवासियांना पडले पेचात
ठळक मुद्देसंबंधित अधिका-यांनी याठिकाणी तत्काळ चौकशी करुन कायमस्वरुपी तलाठ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.