ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 26 - देशभरात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळा प्रकरणात सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़आऱ शर्मा यांच्या न्यायालयात उत्तर प्रदेशातील तत्कालीन कोषागार अधिकारी दिवेश सिंग यांची साक्ष व उलटतपासणी झाली़ रेल्वेने आलेल्या एकूण ५०० रुपयांच्या स्टॅम्पमध्ये ४०४ स्टॅम्प गहाळ असल्याची साक्ष त्यांनी न्यायालयात दिली़ दरम्यान या प्रकरणात मंगळवारी (दि़२७) आणखी तिघांची साक्ष होणार आहे़मुद्रांक घोटाळा प्रकरणाची नियमित सुनावणी नाशिकच्या विशेष न्यायालयात सुरू आहे़ मुद्रांक घोटाळ्यात सीबीआयचे विशेष वकील अमरीश के. पांडे यांनी दिवेश सिंग यांची साक्ष घेतली असता त्यांनी रेल्वेने आलेल्या स्टॅम्प गहाळ असल्याचे सांगितले़ तर अॅड़ दौलतराव घुमरे यांनी उलटतपासणी घेतली़ मुद्रांक घोटाळा प्रकरणात सुमारे पन्नासहून अधिक साक्षीदार असून, न्यायालयात त्यांची साक्ष नोंदविण्याचे काम सुरू आहे़ देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यात अब्दुल करीम लाडसाब तेलगी, रामभाऊ पुंजाजी पवार, ब्रिजकिशोर तिवारी, विलासचंद्र राजाराम जोशी, प्रमोद श्रीराम डहाके, मोहम्मद सरवत हे या घोटाळ्यातील आरोपी असून, त्यांच्यावर १२० ब, ३८०, ४११ व ५४४ व लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत़ यामध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २५ आॅगस्ट २००४ मध्ये या आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ रोजी विशेष न्यायालयाने या संशयितांवर आरोपपत्र निश्चित केले होते़ २१ नोव्हेंबर २०१६ पासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरू झाली असून यामध्ये तेलगीकडून अॅड़ सतीश घुमरे, अॅड़ दौलतराव घुमरे, अॅड़ एम़ वाय़ काळे, अॅड़ एस़ वाय़ टिकले, अॅड़ अनिल पुंड हे काम करीत आहेत़ (प्रतिनिधी
तेलगी मुद्रांक घोटाळयात कोषागार अधिकाऱ्याची साक्ष पूर्ण
By admin | Published: December 26, 2016 11:13 PM