त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळेगाव अंजनेरी शिवारातील पाच एकर शेवगा व पेरू बागेवर अज्ञात नागरिकांनी तणनाशकाची फवारणी करुन पेरू व शेवग्याच्या झाडांना भरपूर फळे (शेंगा) व फुले लागली होती. या सर्व झाडांवर अज्ञात इसमांनी तणनाशक तथा तत्सम औषधाची फवारणी करून सर्व झाडांचा नायनाट केला. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दि. २४ ऑगस्ट रोजी तळेगाव (अंजनेरी) येथील तरुण शेतकरी संदीप देवकिसन दाते या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पेरू आणि शेवग्याची पाच एकर बाग यशस्वीरीत्या उभी केली होती. पण नुकतेच सकाळी शेतात फेरफटका मारायला गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या बागेवर कुणी तरी तण नाशकाची फवारणी केली आहे. शेवग्याची व पेरूची पाने पिवळी पडून गळत होती. तर काही ठिकाणी तणनाशक उडाले नसल्यामुळे हिरवीगार पालवी होती. सदर घटना लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही गोष्ट दाखवली. सर्व शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीबद्दल संताप व्यक्त केला. याबाबत त्वरित माहिती शिवसेना नेते शांताराम चव्हाण यांना दिली.
चव्हाण यांना ही माहिती कळताच त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच कृषी अधिकारी राहुल शिंदे यांना रोशन चव्हाण यांनी माहिती देताच कृषी अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी शेतकरी दशरथ दाते, देवकिसन दाते, अर्जुन दाते, रामदास दाते, विश्वनाथ दाते, दशरथ दाते, अंबादास दाते, दिनकर दाते, नंदू दाते, योगेश दाते आदी शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे पीडित शेतकरी संदीप दाते व शांताराम चव्हाण यांनी पोलीस तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे अधिक तपास करीत आहेत. (२५ टीबीके १)
250821\25nsk_12_25082021_13.jpg
२५ टीबीके १