नाशिक : सातबारा उताºयाचे आॅनलाइन संगणकीकरण करणाºया तलाठी, मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा महा आॅनलाइनच्या सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असल्याने कामकाज करणे कठीण झाले आहे. येत्या १२ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हरच्या गतीत सुधारणा न झाल्यास सातबारा संगणकीकरणाचे कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.शुक्रवारी या संदर्भात तलाठी संघाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, ई फेरफार इडिट, रि-ईडिटचे काम करत असताना सर्व्हरला स्पिड नसल्याने काम होत नाही. याबाबत आॅगस्ट महिन्यातही निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. परंतु सर्व्हरचा वेग वाढलेला नाही. मागील आठवड्यात चार दिवस सर्व्हर बंद होते. त्यावेळी सर्वांचा स्पिड वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु सर्व्हरचा स्पिड वाढण्याऐवजी कमी झाला. शेतकºयांना सातबारा उतारा देण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे लागत आहे. ई फेरफार नोंदी टाकणे व प्रमाणित करण्याच्या कामातही सर्व्हरला स्पिड नसल्याने अनेक दस्त नोंदी टाकण्यासाठी प्रलंबित आहेत. जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने तलाठी व मंडळ अधिकाºयांवर शेतकरी व जनता नाराज आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग घडत असून, जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत. दिवस-रात्र पूर्ण क्षमतेने काम करूनही सर्व्हरमुळे कामाची प्रगती दिसत नाही. त्यामुळे जनतेत महसूल खात्याची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. तलाठी व मंडळ अधिकाºयांनी कामावर बहिष्कार टाकावा असा दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या ११ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हरचा स्पीड वाढला नाही, तर १२ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी सातबारा आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकतील, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी एन. वाय. उगले, एम. एल. पवार, बी. व्ही. खेडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तलाठी सर्व्हरमुळे मेटाकुटीस,कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 6:44 PM