वणी : येथील किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअम स्कूल, पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी किसनलाल बोरा, भौतिकशास्त्रतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सहावी ते आठवी उच्च प्राथमिक गट, तर नववी ते बारावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या. शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षक (पहिली ते आठवी) व माध्यमिक व उच्च माध्यमिक (नववी ते बारावी) आणि प्रयोगशाळा परिचर यांचा स्वतंत्र गट होता.विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान होता. उपविषय शाश्वत कृषीपद्धती, स्वच्छता आणि आरोग्य, संसाधन व्यवस्थापन, औद्योगिक विकास, भविष्यकालीन परिवहन, संचार व शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतिकृती असे होते, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळवे यांनी दिली. प्रदर्शनात प्राथमिक शाळा - १०३, माध्यमिक शाळा - ५६, प्राथमिक शिक्षक गट - २८, माध्यमिक शिक्षक गट - १०, प्रयोगशाळा परिचर - ३, आणि व्यवसाय मार्गदर्शन - ४ अशा २०४ शाळांचा सहभाग होता.या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होईल, असे मत संस्थेचे चेअरमन बोरा यांनी व्यक्त केले. जनरल सेक्र ेटरी अलकेश खाबिया, व्हाइस चेअरमन मूलचंद बाफणा, संचालक किशोर बोरा, सुनील समदडिया, गितेश बोरा, दीपक पारिक, प्रकाश खाबिया, मनोज बोथरा व मान्यवार उपस्थित होते.समारोप व बक्षीस वितरण कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती कैलास पाटील होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, छाया गोतरणे, पंचायत समिती सदस्य एकनाथ गायकवाड, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, उपसरपंच मनोज शर्मा, संतोष कथार, गटशिक्षण अधिकारी डी. बी. कनोज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यु. टी. बोरसे, जे. व्ही. ठोके, एम. के. चौरे, ए. व्ही. रौंदळ, व्ही. व्ही. सानप, प्रल्हाद खांबेकर होते.यावेळी रूपाली पगार, श्रीमती एस. डी. अहिरे, एस. एस. घोलप, श्रीमती एम. एस.कोेष्टी, के. पी. सोनार, सी. बी. गवळी, के. के. आहिरे, डी. यू. आहिरे, ए. डी. काळे, किसन पवार, किशोर बोरा, मार्कस साळवे, प्रीतम पाठे, लता शेवाळे, प्रकाश खैरनार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी एस. पी. पगार व दीप्ती रोकडे यांनी केले. आभार डी. जी. वाणी यांनी मानले.
वणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:03 PM
वणी येथील किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअम स्कूल, पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी किसनलाल बोरा, भौतिकशास्त्रतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ठळक मुद्दे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन गटात स्पर्धा