तळवाडे गावाकडून रावळगाव जाणाऱ्या रस्त्याला मोठी वर्दळ असते. विविध कामानिमित्त नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. शेतीसंबंधी वस्तू साहित्याची ने-आण, बाजारासाठी रावळगाव जाणे होते. मात्र या रस्त्याची दुरवस्था झालेली दिसून येत आहे, तळवाडे धरणाजवळील वळण रस्त्याला लागून असलेल्या काटेरी झुडपे धोकेदायक ठरत आहेत. यामुळे ही झुडपे काढणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून, प्रवाशांच्या अडचणीत भर पडत आहे.
काटेरी झुडपे असल्यामुळे प्रवाशांना दुचाकी व इतर वाहनांनी प्रवास करत असताना समोरून येणारी वाहने दिसण्यास अडचण निर्माण होते. गाव खेड्यातील रस्त्यांकडे संबंधित विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. म्हणून तत्काळ कार्यवाही करीत रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
छायाचित्र - ०४ तळवाडे
तळवाडे-रावळगाव रस्त्याला धरणाजवळील वळण रस्त्यालगत काटेरी झुडपांचा वेढा.
040721\3430381304nsk_23_04072021_13.jpg
तळवाडे -रावळगाव रस्त्याला धरणाजवळील वळण रस्त्यालगत काटेरी झुडपांचा वेढा.