सिडको : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार यांनी ५४४ मते मिळवित विजय संपादन केला, तर विरोधी गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुषार चव्हाण यांना ४९१ मते मिळाली. अवघ्या ५३ मतांनी चव्हाण यांचा पराभव झाला. गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी आयमा रिक्रीएशन हॉल येथे नूतन अध्यक्ष तलवार हे पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्योजकांचे नेतृत्व करणाºया अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत विरोधी एकता गटाने केवळ अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढविल्याने २६ पैकी २५ जागा याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी (दि. २९) मतदान पार पडले. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून वरुण तलवार, तर विरोधी एकता पॅनलकडूनअध्यक्षपदासाठी तुषार चव्हाण या दोघांमध्ये सरळ लढत झाली. सुरुवातीस एकतर्फी वाटणाºया निवडणुकीत जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी निवडणूक चुरशीची होत गेली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६८ टक्के मतदान झाले. आयमा निवडणुकीची बुधवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता अंबड येथील आयमा रिक्र ीएशन सेंटर येथे अध्यक्षपदाच्या एका पदासाठी मतमोजणी सुरू झाली. याठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार व त्यांचे दोन प्रतिनिधी यांच्या समक्ष मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डी. जी. जोशी, सी. डी. कुलकर्णी, मधुकर ब्राह्मणकर यांच्यासह मतदान प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर वरुण तलवार हे काही मतांनी पुढे होते. यानंतर काही मतदान मोजल्यानंतर दोघांमध्ये काही मतांचाच फरक होता. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार यांनी ५४४ मते मिळवित विजयी संपादन केला, तर विरोधी गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुषार चव्हाण यांना ४९१ मते मिळून ५३ मतांनी त्यांचा पराभव झाला. या मतमोजणीच्या वेळी पाच मते अवैध ठरली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन काम करूमतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविल्यानेच माझा विजय झाला. दोन्ही गट हे एकता पॅनलचेच असून, निवडणुकीपुरते वेगळे झालो असलो, तरी दोन्ही एकता पॅनल हे एकच आहे. आता निवडणूक झाली असून, कोणतीही कटूता न ठेवता सर्व सहकाºयांना एकत्र घेऊन व वरिष्ठांच्या मार्गदशनाखाली उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी ते निवडणुकीपुरतेच होते. यापुढील काळात जाहीरनाम्यात दिलेले उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. - वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा
आयमा निवडणुकीत तलवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:03 AM