सटाणा : देशी मद्य घेऊन जाणारा टेंम्पो पलटी झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. तर बाटल्या फुटल्याने तीन लाख रुपयांचे मद्य वाहून गेले .हा अपघातात गुरुवारी (दि. 29) दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील मोरेनगर नजीक घडला.नासिक येथून बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे देशी मद्य (टैंगो) घेऊन जाणारा टेंम्पो (टऌ 15-अॠ 5886) याचे गुरूवारी दुपारी दीड वाजता मोरेनगर गावा जवळील सबस्टेशन समोर डाव्या बाजूचे मागचे टायर फुटल्याने टेंम्पो जागीच पलटी झाला. टायर फुटल्याचा आवाज ऐकुण परिसरातील नागरीक रस्त्यावर आल्यावर त्यांना टेंम्पो पलटी झाल्याचे दिसले. यावेळी येथील सामाजीक कार्यकर्ते परशुराम पाकळे, पिंपळदरचे सरपंच संदीप पवार,अनिल पगारे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मद्यच्या खोक्यांखाली अडकलेल्या कामगारांना व कॅबीन मध्ये अडकलेला चालक यांना बाहेर काढून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या अपघातात शुभम रवि नायक( 25) नासिक रोड याचा हात फॅक्चर होऊन तोंडाला दारूच्या बाटल्यांचे काच लागून गंभीर जखमा झाल्या आहेत तर चालक फकीरा भगवंता बर्वे (50), संजय नामदेव डांबेकर(52), देविदास श्रीधर भालेराव (28) नासिक रोड, आनंद शंकर पगारे(पिंपळदरा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे , पोलीस कर्मचारी पुंडलीक डंबाळे,अजय महाजन, योगेश गुंजाळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. अपघात स्थळी आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी सटाणा नगर परिषरीषदेची अग्नीशामक गाडीही तात्काळ दाखल झाली होती. या अपघाता दारूच्या बाटल्या फुटल्याने रस्त्यावर काचांचा खच पडला होता. यावेळी परिसरातील व रस्त्याने जानाऱ्यात तळीरामांनी मात्र हात साफ करून घेतला.