नाशिक : जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, जुलै अखेरीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना आगामी महिन्यात पाऊस पडण्याविषयी साशंकता असल्याने सिन्नर, येवला व नांदगाव या तीन तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आराखड्यानुसार दरवर्षी ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास शासनाची अनुमती आहे. शासनाच्या मते जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन जोरदार पाऊस पडत असल्याने गावोगावचे पाण्याचे स्रोत पूर्ववत होऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो. परंतु अलीकडे काही वर्षांपासून जून महिन्यात मान्सूनचे आगमन होत असले तरी, पाऊस अगदीच नगण्य पडत असल्यामुळे जून व जुलै महिन्यातही टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यंदाही जिल्ह्णातील सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, बागलाण या सहा तालुक्यातील ६८ गावे, १४० वाड्यांना जुलैअखेर ५१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैअखेर टॅँकरला अनुमती दिलेली असल्याने १ आॅगस्टपासून पाण्याचे टॅँकर बंद करण्यात येणार आहे.सिन्नर तालुक्यात आजवर ४८ टक्के, येवला येथे ५७ टक्के पाऊस झाला असून, त्यातही तालुक्याच्या काही भागात पावसाचा लवलेशही नाही.पर्याय नाहीच्नांदगाव तालुक्यात ६६ गावे, सिन्नरला ४१ व येवला येथे ५० गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे, सध्या या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास टॅँकरशिवाय पर्याय नसल्याने टॅँकरला मुदतवाढ द्यावी, असे प्रस्ताव तालुका पातळीवरून सादर करण्यात आले होते. त्यास जिल्हाधिकाºयांनी मान्यता दिली असून, येत्या ३१ आॅगस्टअखेर टॅँकर सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे.
तीन तालुक्यांतील टॅँकरला एक महिना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:16 AM