सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथील आटोकॉम्प इंडिया कारखान्यात ताब्यांच्या पाईपांसह आॅल्युवेल्डची चोरी करण्यात आली आहे.याबाबत कारखान्याचे देवीदास पुंजाराम आहेर यांनी एमआयडीसी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी सकाळी ८ या दरम्यान चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कंपनीच्या गोडावूनमध्ये ठेवलेले तांब्याचे प्रत्येकी १२९ किलोमीग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ६ हजार ९९० रूपये किमतीचे चार नग चोरीला गेले आहेत. त्याची एकुण किंमत ४ लाख २६ हजार ३६९ रूपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आॅल्यु वेल्ड योकमचे ५ खोकेही चोरीला गेले आहेत. प्रत्येक खोक्यात २० नग आहेत. त्याची एकुण ७२ हजार ६१४ रूपये किंमत आहे. असा एकुण ४ लाख ९८ हजार ९८३ रूपयांचा माल चोरीला गेला आहे. पुढील तपास हवालदार जी. पी. लावणे हे करीत आहे.
माळेगाव येथील आटोकॉम्प कारखान्यातील तारा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 6:20 PM