नाशिक : जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पतपुरवठा (कर्जपुरवठा) निश्चित करण्यातआला असून, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तीन कोटी ३० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे, तर रब्बी हंगामासाठी एक कोटी ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यासाठी पीकनिहाय एकरी कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे.मागील वर्षी खरीप हंगामात विविध वित्तीय संस्थांमार्फत जिल्ह्यातील ५३ हजार ५२४ शेतकऱ्यांना एक कोटी ६२ हजार ३२६ रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला होता. यावर्षीही खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकºयांनाकर्जपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, पिकानुसार एकरी कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.मका पिकासाठी एकरी १५ हजार रुपये तर सोयाबीनसाठी एकरी १८ हजारांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. बाजरी, ज्वारीसाठी १२ हजाररु पये तर भातासाठी एकरी १८ हजाररु पये कर्ज देण्यात येणार आहे.ऊस लागवडीसाठीही कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या उसासाठी एकरी ३५ हजार तर टिश्यूकल्चर उसासाठी एकरी २८ हजार रुपये कर्जपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. कापूस, कांदा या नगदी पिकांसाठी ही कर्ज पुरवठा निश्चित करण्यात आला आहे.कांदा लागवडीसाठी कितीही खर्च येणार असला तरी कांद्याला एकरी ३० हजार रु पयाप्रमाणे कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातून यावर्षी प्रथमच आल्याची निर्यात झाली असून आले आणि हळद लागवडीसाठी एकरी २० हजार रूपयांचे कर्ज मिळणार आहे.-----------------------कर्ज वाटपसन २०१९ -२० खरीप कर्ज वाटप (आकडे लाखात) राष्ट्रीयकृत बँक -११७६०४ खासगी बँक -२५२१२ ग्रामीण बँक - २९० जिल्हा सह. बँक - १९२२०
खरिपासाठी तीन कोटींहून अधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 9:16 PM