नाशिक : पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजनेतून जिल्'ात सुमारे तीन लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या २ किंवा ३ जुलैला ही वृक्षलागवड एकाचवेळी जिल्'ात करण्यात येणार आहे. काल (दि.२०) यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वृक्षलागवडीसह जलयुक्त शिवार अभियानाचाही आढावा घेण्यात आल्याचे कळते. पावसाळा सुरू झाल्याने पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत जिल्'ात यावर्षी सुमारे तीन लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले असून, त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी ५० हजारांचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे समजते. त्यातही देवळा तालुक्यासाठी २५ हजार, तर बागलाण तालुक्यासाठी ७५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काल या आढावा बैठकीत सर्व खातप्रमुखांना सूचना देण्यात आल्या. तसेच २ किंवा ३ जुलैला एकाच वेळी सर्वत्र वृक्षलागवडीसाठी नियोजन करण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्'ात करावयाच्या कामाबाबतही लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्'ात तीन लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ३ जुलैला होणार एकाचवेळी वृक्षलागवड
By admin | Published: June 21, 2015 1:14 AM