नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगूर येथील सावरकरांच्या जन्मस्मारकात त्यांच्या स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शहर, जिल्ह्यातील सावरकरप्रेमींनी हजेरी लावली. पुरातत्व विभागाच्या वतीने स्मारकात पूजन करण्यात आले.भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने भगूर येथील त्यांच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी सकाळपासून स्मारकात सावरकरप्रेमींची गर्दी झाली होती. खासदार हेमंत गोडसे यांनी सावरकरांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार अर्पण केला. राज्यातील विविध भागांतून अनेकांनी भगूरला हजेरी लावली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि मित्रमंडळाच्या वतीने स्वा.वीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली.महाराष्टÑ शासनाचे पुरातत्व विभाग, सावरकर जन्मभूमी समिती तसेच भगूर नगरपालिका यांच्या वतीने भगूरमधील जन्मभूमी स्मारकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर जन्मभूमीला अभिवादन करण्यासाठी दिवसभर राज्यातील अनेक भागांतून सावरकरप्रेमी आले होते. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.तत्पूर्वी सकाळी भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने शासकीय पूजा करण्यात आली. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, जया वहाणे, विजयकुमार धुमाळ, सोमनाथ गोराडे आदी उपस्थित होते. त्यानंतर चारु दत्त दीक्षित यांच्या बागेश्रीनिर्मित वाद्यवृंदाने सावरकरांच्या जीवनावरील कवितांचा कार्यक्र म सादर केला. भगूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे नगरसेवक रघुनाथ साळवे संजय शिंदे, कविता यादव, अश्विनी साळव, जयश्री देशमुख आदी नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी चौकातील स्वा. वि. दा. सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.वीर सावरकर उत्सव समिती, भगूरवीर सावरकर उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौकात शिवसेना जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विविध मान्यवर यांचा सत्कार करून नूतन विद्यामंदिर व ति. झ. विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.नाशिकरोडला अभिवादनस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त नाशिकरोड परिसरात विविध संस्थांच्या वतीने प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व मित्रमेळा संस्थांच्या वतीने प्रतिमापूजनप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेविका सीमा ताजणे, अनिता सातभाई, नगरसेवक अंबादास पगारे, बाजीराव भागवत, राजेंद्र ताजणे, शांताराम घंटे, सुभाष घिया, कांता वराडे, शुभांगी रत्नपारखी, मुकुंद आढाव, शंकर साडे, शिवाजी उगले, भास्कर शेलार, सचिन सूर्यवंशी, रिंकू झनकर, अरु ण निरगुडे, मधुकर पाटील, नैयुम खान, नारायण नागरे, किशोर कानडे, भगवान मोर, बाळासाहेब दंडगव्हाळ, नंदू हांडे, सुजाता जोशी, पंडित रामशास्त्री, बल्लू ठाकूर, दिनकर झाडे, पप्पू रोजेकर, विनोद नाझरे आदी उपस्थित होते.सिन्नर फाटा येथील पत्रकार योगी स्वा. सावरकर वाचनालयात प्रतिमापूजनप्रसंगी वाचनालयाचे सचिव सतीश बागुल, प्रा. भरत खंदारे, अनिल अस्वले, ग्रंथपाल कल्पना वराडे, ओम उगले, तरुण महाराष्ट्र मित्रमंडळाचे सचिव अर्जुन दवते आदी उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी सह. पतसंस्थेमध्ये प्रतिमापूजन करताना संस्थेचे अध्यक्ष नंदू (गोविंद) गोखले संचालक श्रीमती शकुंतला करवा, संजय कोचरमुथा, जितेंद्र परदेशी, नंदा ढोले, विजय देशमुख, अनिल घोडके, कैलास कोरडे, सुभाष बैरागी आदी उपस्थित होते.
ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:54 AM