नाशिक : पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या उद्यानात महापालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण आणि अन्य प्रकल्प राबविण्यास टाटा उद्योग समूह तयार असून, त्यांनी तसे पत्र पालिकेला धाडले आहे. वनखात्याच्या मालकीचे हे उद्यान केवळ सुशोभीकरण आणि अन्य प्रकल्पांसाठी महापालिकेला मिळावे यासाठी राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला प्रस्ताव दिला होता त्यावेळी त्याचे काहीही झाले नसले तरी युती सरकारच्या कारकिर्द सुरू होताच बैठका झाल्या आणि हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. वनखात्याची ही जागा वनविकास महामंडळास हस्तांतरित करण्यात येणार असून, त्यानंतर ती पालिकेला सुशोभीकरणासाठी दिली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
वन खात्याच्या उद्यानासाठी टाटा तयार
By admin | Published: May 31, 2015 12:42 AM