शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

निफाड तालुक्यातील करवसुली निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 9:06 PM

सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ निम्मी करवसुली झाली आहे.

ठळक मुद्देदैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे.

सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ निम्मी करवसुली झाली आहे.वार्षिक ताळेबंद हा मार्च महिन्यात असतो. दरवर्षी मार्च महिना सुरू होईपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी थकीत आणि चालू वर्षाचे कर भरत असतात. यंदा मात्र मार्च महिना सुरू झाला असला तरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व कर भरण्यास नागरिकांची टाळाटाळ सुरू आहे. वर्षभर असणारा कोरोना आणि त्यामुळे गेलेली हातातील कामे यामुळे चार पैसे गाठीशी आले नाहीत, बेरोजगारी वाढली, कुटुंब चालवणे अवघड असताना कर कुठून भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. द्राक्ष शेती सलग दुसऱ्या वर्षी तोट्यात आहे. खर्चसुद्धा वसूल होत नाही, अशा परिस्थितीत बँक कर्ज, मुलांचे लग्न, घर खर्च, शिक्षण, दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे.ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळत नाही, त्यामुळे पैसे कोठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे.ग्रामपंचायत वर्षभर जमा होणाऱ्या करातून कर्मचाऱ्यांचे पगार, पाणी पुरवठा, किरकोळ दुरुस्ती, लाईट बिल, फर्निचर, स्टेशनरी अशी कामे करीत असते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच यांच्या मर्जीतील दोन किंवा तीन माणसांना कर्मचारी म्हणून घेतले आहे. आज पगार वेळेत होत नसल्याने तेच कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.कधी नव्हे; इतका ग्रामपंचायत कर थकीत झाला आहे. विविध कारणांनी नागरिक अडचणीत आले असले तरी ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. वसुली झाली नाही तर कामे करणे अवघड होईल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.- संदीप कराड, गटविकास अधिकारी पंचायत समिती, निफाड.सन एप्रिल २०२० ते मार्च २०२१घरपटीचे उद्दिष्ट१५ कोटी ४४ लाखझालेली वसुली७ कोटी ८४ लाखपाणीपट्टीचे उद्धिष्ट७ कोटी २५लाखझालेली वसुली३ कोटी२२ लाखथकीत रक्कम११ कोटी

टॅग्स :nifadनिफाडTaxकर