नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीस नशिक वकील संघाने विरोध केला असून, या करवाढीविरोधात लढणाऱ्या नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीला पाठिंबा दिला आहे़ जिल्हा न्यायालयातील जुन्या लायब्ररी हॉलमध्ये झालेल्या वकील संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़नाशिक बार असोसिएशचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे यांनी करवाढीमुळे भविष्यात निर्माण होणाºया परिणामांची माहिती दिली़ तसेच कृती समितीस पाठिंबा दर्शवून प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असे सांगितले़ कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी महालिकेच्या करवाढीच्या निर्णयावर टीका करून या आदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले़ शेतजमीन, बिनशेती क्षेत्र, रुग्णालये, हॉटेल्स, वसतिगृहे, शाळा, क्रीडांगणे यांनाही महापालिकेने करवाढ केली असून, या अन्यायाबाबत एकत्र येण्याचे आवाहन केले़महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड़जयंत जायभावे यांनी या करवाढीचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी वकिलांची एक समिती तयार करून महापालिकेला कायदेशीर सल्ला देण्यात येणार असल्याचे सांगितले़ तसेच हा सल्ला महापालिकेने न मानल्यास वा दरवाढ नियमानुसार न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे सुतोवाच जायभावे यांनी केले़ कृतीसमितीचे सल्लागार उन्मेष गायधनी यांनी सांगितले, की महापालिकेची करवाढ ही चौरस फुटाला लागू केली असली तरी प्रत्यक्षात क्षेत्राचे मोजमाप हे चौरस मीटरने केले जाते आहे़ त्यामुळे महापालिका ही नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे गायधनी म्हणाले़महापालिकेच्या करवाढीमुळे सर्वसामान्य माणसास सर्वाधिक फटका बसणार असून, वकिलांनाही करवाढीचा मोठा फटका बसणार आहे़ यावेळी माजी उपमहापौर गुरमित बग्गा, त्र्यंबक गायकवाड, दत्ता गायकवाड, अॅड. मुकुंद आढाव, नाशिक संघाचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश आहुजा, सह सेक्रेटरी अॅड. श्यामला दीक्षित, सदस्य अॅड. हर्षल केंगे, अॅड. शरद मोगल, अॅड. महेश लोहिते, अॅड. सोनल कदम तसेच वकील उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन अॅड. शरद गायधनी यांनी, तर आभार अॅड. जालिंदर ताडगे यांनी मानले.
करवाढीला वकिलांचाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:05 AM
नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीस नशिक वकील संघाने विरोध केला असून, या करवाढीविरोधात लढणाऱ्या नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीला पाठिंबा दिला आहे़ जिल्हा न्यायालयातील जुन्या लायब्ररी हॉलमध्ये झालेल्या वकील संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़
ठळक मुद्देअॅड़ नितीन ठाकरे यांनी करवाढीमुळे भविष्यात निर्माण होणाºया परिणामांची माहिती दिली़ कृती समितीस पाठिंबा दर्शवून प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल,