सटाणा : नगरपालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीची ९५ टक्के करवसुली करून नाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा विक्रम केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी येथे दिली.या आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टीची तीन कोटी ६६ लाख रुपये करवसुली झाली असून, प्रशासनाने योग्य नियोजन करून वसुली विभागातील १ ते ११ या सर्व झोनचे प्रमुख आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळेच ही विक्रमी करवसुली शक्य झाली. नागरिकांनीही मुदतीत आपली थकबाकी भरून प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे हा लक्षांक गाठू शकलो, असेही डगळे यांनी स्पष्ट केले. ज्या नगर परिषदांची कर वसुली ९० टक्क्यांपेक्षा जास्त होईल त्याच नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्ति-वेतनासाठी शासनाकडून १०० टक्के सहाय्यक अनुदान मिळणार आहे. विक्रमी करवसुली झाल्याने शासनाकडून आता सहाय्यक अनुदान प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे नगरपालिका निधीतून वेतन व निवृत्तिवेतन यावर होणारा खर्च वाचणार असल्याने शिल्लक सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. काही थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी वेळप्रसंगी कटु निर्णय घ्यावे लागले असल्याचे डगळे यांनी नमूद केले.
कर वसुलीत सटाणा पालिका विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:31 AM
सटाणा : नगरपालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीची ९५ टक्के करवसुली करून नाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा विक्रम केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी येथे दिली.
ठळक मुद्देनाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा विक्रम थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी वेळप्रसंगी कटु निर्णय घ्यावे लागले