मालेगाव: सोयगाव: -आज (दि.१०) सकाळी अकरा वाजता टिडीएफ व माध्यमिक शिक्षक संघामार्फत शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष आर.डी.निकम यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरूवात केली .वेतन पथक अधिक्षक उदय देवरे यांची बदली नाशिक जिल्ह्याबाहेर करण्यात यावी, विधायक कार्य समिती, सटाणा येथील ३९ कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्यात यावे,तसेच प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करावी, सातव्या वेतन आयोगासह वरीष्ठ श्रेणी, निवड श्रेणी,इन्क्रीमेंट, सातव्या वेतन आयोगाचा काही शाळांचा पहिला हफ्ता, डिसीपिएस व पिएफ स्लिपा, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहा महिने आधी सेवानिवृत्तीचा प्रस्ताव न पाठवणार्या संस्थांवर , संस्थांवर तसेच मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी टिडीएफचे आमरण उपोषण सुरू झाले होते.
काही वेळाने या ठिकाणी भद्रकाली पोलिस ठाण्याचे काही अधिकारी व कर्मचारी आले,त् शहरात कोविड प्रतिबंधात्मक नियम लागू असून जमावबंदी आदेश असल्याने उपोषण करण्यास मज्जाव केला. अधीक्षक सुधीर पगार,भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्यासमवेत कार्यालयात तीन तास बैठक घेण्यात आली, वेतन पथक अधीक्षक शउदय देवरे यांची नाशिक जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी या संदर्भात ते अधिकार या कार्यालयाला नसून या संदर्भात शासन स्तरावर प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. तसेच देवरे यांच्या बदलीबाबत आपण शिक्षण उपसंचालक कार्यालयाला यासंदर्भात अहवाल पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघटनेच्या इतर मागण्यांच्या संदर्भात शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात येऊन 19 जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेची पुन्हा बैठक घेऊन इतर प्रश्न निकाली काढनार असल्याचे सांगितले.सुधीर पगार यांनी तसे लेखी पत्र दिल्याने तूर्त अमरण उपोषण मागे घेण्यात आले.आंदोलनात जिल्हा टी डी एफ चे अध्यक्ष निकम, माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, साहेबराव देवरे, मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन देशमुख, देवळा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सचिन शेवाळे, मालेगाव तालुका टीडीएफ चे अध्यक्ष जयश सावंत कार्यवाह आशिष पवार,वीरेंद्र महाले पप्रशांत सोनवणे दीपक महिरे,जितेंद्र पवार, प्रकाश देवरे, नितीन बिरीज केतन जोगळे हर्षल जाधव, श्याम सोनवणे,मयूर सोनवणे पंकज दळवी यासह कर्मचारी उपस्थित होते.