सटाणा : येथील नगरपालिकेच्यावतीने १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले. उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरु ळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.देवमामलेदार यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष संगीता देवरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले, कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, विस्तार अधिकारी पी. आर. जाधव, पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, राकेश खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंगरु ळे यांनी संस्कारक्षम पिढी तसेच देश घडविण्याच्या महान कार्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले. शिक्षकांकडून मिळालेले चांगले संस्कार विद्यार्थ्यांना जीवनात शिदोरी म्हणून उपयोगी येतात. अशा शिक्षकांच्या कार्याचा आदर्श घेत आजच्या शिक्षकांनी सुसंस्कारित पिढी घडवावी, असेही त्यांनी आवाहन केले. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी झोकून देत काम करणा-या शिक्षकांचा गौरव करणारी सटाणा पालिका ही राज्यातील एकमेव पालिका असल्याचे सांगितले. कार्यक्र मास बागलाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, बांधकाम सभापती सुनिता मोरकर, नगरसेवक दीपक पाकळे, महेश देवरे, बाळू बागुल, सोनाली बैताडे, पुष्पा सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, सुलोचना चव्हाण, आदींसह नागरिक उपस्थित होते. राकेश थोरात व संजय भामरे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.पुरस्कारप्राप्त शिक्षकरमाकांत भामरे (अध्यक्ष, तालुका विज्ञान अध्यापक संघ), सतीश जाधव (ब्राह्मणगाव), अनिल जाधव (मुख्याध्यापक, व्ही. पी. एन. विद्यालय, सटाणा), सुनिता गांगुर्डे (उपशिक्षका, प्रगती विद्यालय, सटाणा), अश्विन पाटील (संगीतशिक्षक), चंद्रकांत सोनवणे (शिक्षक), जयश्री गुंजाळ (उपमुख्याध्यापिका, बागलाण इंग्लिश मिडीअम स्कूल, सटाणा), किशोर मेधने (लखमापूर), कुंदन चव्हाण (करंजखेड), नितीन सोनवणे (नामपूर), सुजित देसले (आनंदनगर), रवींद्र पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्र पाटील (देवळाणे), मधुकर भामरे (केंद्रप्रमुख).
सटाणा पालिकेतर्फे शिक्षक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 5:32 PM
१४ शिक्षक सन्मानित : उपजिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते वितरण
ठळक मुद्देउपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरु ळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण