नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान सुरू असताना जिल्हा परिषदेजवळील बी. डी.भालेकर शाळेजवळ निवडणुकीच्या रिंगणातील दोन उमेदवारांचे समर्थक आपआपसांत भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तत्काळ हाणामारी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेतले.जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान, निवडणूक रिंगणातील किशोर दराडे, संदीप बेडसे या उमेदवारांच्या दोन समर्थकांमध्ये वादविवाद होऊन हाणामारी झाली. सोशलमिडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्याच्या संशयावरुन समर्थक भिडल्याचे बोलले जात आहे.
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : उमेदवारांचे समर्थक नाशकात भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:50 PM
सोशलमिडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्याच्या संशयावरुन समर्थक भिडल्याचे बोलले जात आहे.
ठळक मुद्देदराडे-बेडसे या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादविवाद केेंद्राबाहेर काहीसे तणावाचे वातावरण पसरले होते