नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना अनिवार्य आहे.पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठीच्या टीईटी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. ८ ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ४ ते १९ जानेवारी २०२० दरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्राची आॅनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहे. पहिला पेपर १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १, तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे. प्रवेशासंबंधीची सर्व माहिती, संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.टीईटी परीक्षेचे वेळापत्रकआॅनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दि.८ ते २८ नोव्हेंबर ४प्रवेशपत्र आॅनलाइन प्रिंट काढणे दि. ४ ते १९ जानेवारी २०२० ४शिक्षक पात्रता परीक्षा पेपर (एक )- दि.१९ जानेवारी २०२०स. १०.३० ते दुपारी १ ४पेपर (दोन) - दि.१९ जानेवारी २०२० दुपारी २ ते सायं. ४.३०
१९ जानेवारीला शिक्षक पात्रता परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:15 PM
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना अनिवार्य आहे.
ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक पदासाठी अनिवार्य : २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत