पेठ : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टीचर इनोव्हेशन अॅवार्ड २०२० राज्यातील १०३ शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे.शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार एज्युकेशन इनोव्हेशन बँक या प्रकल्पांतर्गत हे अॅवार्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणकि प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते.या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कॉन्फरन्स’मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणकि प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्र माची मेजवानी याठिकाणी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अवार्ड विजेत्या शिक्षकांमध्ये प्राथमिक गटात नाशिकच्या सहा प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. सोपान खैरनार, जि प शाळा मोरेनगर सटाणा, वैशाली भामरे, जि प शाळा मानके व विशाल बोरस,े नवीन प्राथमिक शाळा भुईकोट किल्ला ता मालेगाव, ज्योती खैरनार, जि प शाळा शिवडे ता. सिन्नर, वैशाली सूर्यवंशी, जि प शाळा खालपफाटा व खंडू मोर,े जि प शाळा फांगदर देवळा, नितिन केवटे, तोरंगण ता. त्र्यंबकेश्वर येथील शासकीय आश्रमशाळा या शिक्षकांना जाहिर झाला आहे, असे सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ व हेमा शिंदे यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डायट प्राचार्य डॉ वैशाली झनकर सर फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तसेच जिल्हाभरातील शिक्षकांनी कौतूक केले आहे. (६ फोटो ०३ नावाने केले आहे.)
राज्यातील १०३ शिक्षकांना टीचर इनोव्हेशन अॅवार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 4:50 PM
पेठ : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टीचर इनोव्हेशन अॅवार्ड २०२० राज्यातील १०३ शिक्षकांना जाहीर झाला आहे.
ठळक मुद्दे सर फाऊंडेशन : नाशिक जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश