उमराणे : तिसगाव (ता.देवळा) येथील एल.व्ही.एच. माध्यमिक विद्यालयात शाळा सुरू करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक सहविचार सभा घेण्यात आली.शासनाच्या परिपत्रकानुसार, आरोग्य अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व सर्व पालक यांच्या संमतीने शाळा सुरू कराव्यात, असा आदेश पाहता या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरस्वती, संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपशिक्षक एस.के. सावंत यांनी सहविचार सभेचे प्रास्ताविक केले. शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.याप्रसंगी पालक कैलास अहेर, भाऊसाहेब जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली, तसेच काही पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. शाळा सुरू करण्याबाबत पालकांचा सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका के.डी. पवार यांनी शाळा सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी व विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी काळजी, याबद्दल माहिती विशद केली.याप्रसंंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के. सावंत यांनी तर आभार प्रदर्शन टी.सी. कन्होर यांनी केले.
शिक्षक-पालक सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:57 PM
उमराणे : तिसगाव (ता.देवळा) येथील एल.व्ही.एच. माध्यमिक विद्यालयात शाळा सुरू करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक सहविचार सभा घेण्यात आली.
ठळक मुद्देतिसगाव येथे शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय