येवला : विनाअनुदानित शिक्षण संस्थेत शिपाई पदाची नोकरी करणाºया युवकावर अचानक काळाने झडप घातली अन् पाठीमागे असलेली पत्नी व छोटी मुले संकटात सापडली. आता त्यांच्या भविष्याचे काय ही चिंता सतावत असल्याने सहकारी शिक्षक व संस्थेने मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या या गरीब सहकाºयाला मदतीचा मोठा हात दिला आहे. संस्थेने काही योगदान देत सर्व सहकाºयांनीदेखील आपल्या एक दिवसाच्या पगाराची रक्कम देत या युवकाच्या कुटुंबीयांना तब्बल पावणेचार लाखांची मदत दिली आहे. येथील जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव येथील कॅम्पसमध्ये पिंपळखुटे तिसरे येथील दीपक बोडके हा सर्वसामान्य कुटुंबातील युवक नोकरी करत होता. मागील आठवड्यात सायंकाळी घरी जात असताना रस्त्यातच त्याच्या मोटारसायकलला अपघात होऊन त्याचे निधन झाले. घरातला कर्ता पुरुषच गमावल्याने या कुटुंबावर मोठे संकटाचे आभाळ कोसळले होते. त्यामुळे मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे यांनी दीपकच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे जाहीर करून सर्व शिक्षक सहकाºयांनीदेखील यात वाटा उचलावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि विनाअनुदानित संस्था असल्याने शासनाकडून त्यांना एक रुपयाची मदत मिळणार नाही हा विचार करून लागलीच सर्वांनीदेखील याला होकार देत आपले एक दिवसाचे वेतन त्यांच्या कुटुंबीयांना दिले.
मृत्यू झालेल्या सहकाऱ्याच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावले शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:13 AM
येवला : विनाअनुदानित शिक्षण संस्थेत शिपाई पदाची नोकरी करणाºया युवकावर अचानक काळाने झडप घातली.
ठळक मुद्देआपल्या या गरीब सहकाºयाला मदतीचा मोठा हात दिलाकुटुंबावर मोठे संकटाचे आभाळ कोसळले होते