पंधरा दिवसापूर्वी दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागात काम करणाºया बी. बी. झिरवाळ यांना जिल्हा परिषदेच्या जाधव नामक शिक्षकाने फोन करून मॅडमची वैद्यकीय फाईल झाली का, रजा मंजूर झाली का नाही असे विचारले त्यावर झिरवाळ यांनी कापडणीस मॅडम का? असे म्हणताच जाधव या शिक्षकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पंचायत समितीच्या कार्यालयात येतो आणि बघतो असे म्हणून दमदाटी केली होती. सदर फोनवरील संभाषण आॅडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल केली.या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता व सादर शिक्षकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती तर याबाबत पोलिसात तक्रारही देण्यात आली होती.या बाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी दिंडोरी पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाºयांकडून चौकशी अहवाल मागविला होता, त्यात शिक्षक महेंद्र जाधव हे दोषी आढळून आल्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार बनसोड यांनी जाधव यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत.