शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

देशाच्या समृद्धीसाठी शिक्षकच दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 11:39 PM

कळवण : शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण करण्याचे आवाहन ॲड. शशिकांत पवार यांनी केले.

ठळक मुद्देशशिकांत पवार : कळवणला सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांचा सत्कार

कळवण : शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण करण्याचे आवाहन ॲड. शशिकांत पवार यांनी केले.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कोरोना कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ॲड.पवार बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक मोतीराम शिंदे , कृष्णाजी बच्छाव, कळवण येथील मुलींच्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पगार, आरकेएम विद्यालयाचे प्राचार्य एल. डी. पगार उपस्थित होते. दोन वर्ष यशस्वी कामकाज केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांचा शिक्षणविस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, पेन्शनर असोसिएशन व शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप पवार, केंद्रप्रमुख रमेश शिंदे, जिभाऊ निकम, पी. के.आहेर, कळवण व देवळा शिक्षक पतसंस्थेचे संचालक भास्कर भामरे, स्वाती शिरसाठ आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. एम. महाडीक व समाधान सोनवणे यांनी केले. वर्षा बच्छाव यांनी आभार मानले.सेवानिवृत्त केंद्रप्रमुख -केदा पगार (मोकभणगी), बापू बहिरम (नांदुरी), मंदा जाधव (पाळे)सेवानिवृत्त मुख्याध्यापक -रामचंद्र अहिरराव (पिळकोस), नारायण बंगाळ (देवळी वणी), कांतीलाल ढुमसे (देसगाव), रवींद्र देशमुख (निवाणे), लीलावती सूर्यवंशी (गणोरे), अंजना कोठावदे (शिरसमणी)सेवानिवृत्त शिक्षक -निंबा जाधव (जामशेत), रोहिदास चव्हाण (वडपाडा), रामदास बागुल (मोहनदरी), हिराबाई जाधव (बेलबारे), यमुना पवार (कळवण मुली), लता जगताप (अभोणा), मीना पवार (देसगाव), निर्मला वळींकर (रामनगर)

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक